सामाजिक बांधिलकी जपत भाजप युवानेते विनोद पाटील यांनी केला वाढदिवस साजरा
पनवेल (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील घोट गावचे माजी सरपंच,भारतीय जनता पार्टीचे युवानेते विनोद पाटील यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
विनोद पाटील यांनी वाढदिवसानिमित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भानघर येथील करूणेश्वर वृद्धाश्रमात अन्नदान केले. यावेळी विनोद पाटील यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. यावेळी करुणेश्वर वृद्धाश्रम व्यवस्थापनतर्फे विनोद पाटील यांना वाढदिवसाच्या आरोग्यमय शुभेच्छा देण्यात आल्या तसेच अन्नदानासाठी आभार मानण्यात आले.
Post a Comment