वंदे भारत एक्सप्रेसचे पनवेल रेल्वे स्थानकात जोरदार स्वागत : स्वागताला पनवेलकर,प्रवासी संघासह भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी
पनवेल - गोव्याहून पनवेलला आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे पनवेल रेल्वे स्थानकात जोरदार स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला,त्यानंतर ही वंदे भारत एक्सप्रेस गोव्याहून मुंबईच्या दिशेकडे निघाली. सायंकाळी पनवेल रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. पनवेलकर,प्रवासी संघासह पनवेलच्या भाजपा कार्यकर्त्यांची स्वागतावेळी गर्दी होती.गाडीवर पुष्पवृष्टी आणि ढोल ताशात स्वागत करण्यात आले.
स्वागताला मंत्री रविंद्र चव्हाण,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बादली, पनवेल महानगरपालिकेचे माजी गटनेते परेश ठाकूर, भाजपाचे अरुण भगत, माजी नगरसेवक- नगरसेविका,पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचप्रमाणे प्रवासी संघाचे श्रीकांत बापट, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment