पनवेलच्या बॉक्सर मुलींची नागपुरात धडकेबाज कामगिरी : सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले
पनवेल- नागपूर येथे १९ वी युवा महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.पनवेलच्या बॉक्सर मुलींनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
मधुरा पाटील हिने सुवर्णपदक जिंकले आणि स्पर्धेतील सर्वात प्रॉमिसिंग बॉक्सरचा पुरस्कार केला. २५ जून २०२३ पासून भोपाळ येथे होणाऱ्या BFI राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मधुरा पाटील ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.योगिनी पाटील ही जवळच्या लढतीत पराभूत झाली आणि रौप्यपदकावर तिला समाधान मानावे लागले. लोखंडी पाड्यातील उन्नती परदेशीने रौप्य पदक जिंकले. प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यांनी मार्गदर्शन केले.
Post a Comment