पनवेल येथे “रन फॉर एज्युकेशन रॅली” चे आयोजन
अलिबाग (जिमाका) :- जी-२० समिट सन २०२३-२४ चे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यानुषंगाने विविध विषयांवर जी-२० समिट चे आयोजन करण्यात येत आहे. जी-२० समिट अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी ठेवून नियोजित कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारच्या स्तरावरून महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यातील “रन फॉर एज्युकेशन रॅली”(“Run for Education rallies”) मुंबई विभागाचे आयोजन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई विभाग यांच्या वतीने रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेज, सेक्टर ३३, सेंट्रल पार्क, पेठ मेट्रो स्टेशन, खारघर, ता.पनवेल येथे मंगळवार दि.20 जून 2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.00 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई यांच्याकडून सहभागी खेळाडू/विद्यार्थी/शिक्षक/प्राचार्य/ मुख्याध्यापक यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीकरिता श्रीमती मनिषा मानकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक मो.७०२०५५५३२९या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयातील खेळाडू, शिक्षक, एन.सी.सी. कॅडेट्स यांनी या रॅलीमध्ये मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती पुनिता गुरव यांनी केले आहे.
Post a Comment