कफच्या अध्यक्षपदी संतोष बहिरा : नवीन चेहऱ्यांमुळे संस्थेच्या कार्याला नवीन दिशा मिळणार
पनवेल- पनवेलमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सिटीझन्स युनिटी फोरमच्या (कफ)अध्यक्षपदी संतोष बहिरा यांची निवड झाली आहे.
सिटीझन्स युनिटी फोरम संस्थेची नवीन कार्यकारणी सभा नुकतीच पार पडली.त्यामध्ये श्री संतोष बहिरा यांची अध्यक्षपदी तर श्री मयूर भोसले यांची सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली.श्री संतोष बहिरा यांची अभ्यासू वृत्ती, सचोटी,संभाषण कौशल्य तसेच गेली अनेक वर्षे दिलेले योगदान पाहून त्यांची सर्वानुमते अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. ते योग गुरु असून विविध क्षेत्रात त्यांच उल्लेखनीय काम केले आहे.
तर मयूर भोसले हे पत्रकार असून नागरिकांशी त्यांचा चांगला समन्वय आहे. श्री मनोज कोलगे यांची उपाध्यक्षपदी नियोक्ती झाली आहे.सामाजिक क्षेत्रात गेली 22 वर्ष पनवेलमध्ये कार्यरत राहून सिटीझन्स युनिटी फोरम संस्थेने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केले आहे.संस्थेचे सर्वेसर्वा श्री अरुण भिसे व डॉ.भगवान बिरमोळे हे सल्लागार म्हणून काम पाहणार असून नवीन सभासदांना काम करण्याची संधी यावेळी मिळणार आहे.मनोज जाधवसह सचिव तर पुरुषोत्तम शेवडे खजिनदाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
वृक्षरोपण,नागरी सुविधा,फसवणूक वा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या समस्या सोडवणे अश्या अनेक विषयांमध्ये संस्थेचे मोठे योगदान आहे.
नवीन चेहऱ्यांना कार्यकारीणीमध्ये संधी मिळाल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे संस्थेच्या कार्याला नवीन दिशा मिळणार आहे.
Post a Comment