जिजाऊच्या लेकी रायगडावर नतमस्तक : कामगार नेते महेंद्र घरत यांनी घडविले १०५० महिलांना किल्ले रायगड दर्शन
पनवेल - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कामगार नेते, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी १०५० महिलांना रायगड दर्शन घडविले.यातील बहुसंख्य महिलांनी किल्ले रायगडाला पहिल्यांदाच भेट दिली,हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास या निमित्ताने अनुभवण्याची संधी या महिलांना मिळाली.
शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या जय शिवराय या छत्रपतींच्या जीवनावर आधारित पुस्तकाची प्रत प्रत्येक महिलेस सप्रेम भेट देण्यात आली. यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान तसेच मनावरचे ताण कमी करण्यासाठी पुण्याहून आलेल्या अनुराधा उरसळ यांनी महिला वर्गाला स्ट्रेस मॅनेजमेंटचे मार्गदर्शन केले.आजच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या जीवनात महिलांना स्वावलंबी बनने काळाची गरज आहे. त्या दृष्टीने कामगार नेते महेंद्र घरत यांनी एक पाऊल पुढे टाकले असून महेंद्र घरत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांचे सर्व महिलांनी आभार मानून त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कामगिरीला यश मिळावं हे साकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना घातले.
Post a Comment