आदर्श समाजसेविका पुरस्काराने सामाजिक कार्यकर्त्या संगीता राऊत सन्मानित
पनवेल : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठान मुंबईच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या संगीता राऊत यांना 'आदर्श समाजसेविका राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय'पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीता राऊत या राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,क्षेत्रातील अनेक संस्थांवर काम करत आहेत.
श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठान मुंबईचे सस्थापक अध्यक्ष भालचंद काशिनाथ पाटील व श्रीराम मांडवकर यांनी आयोजित केलेल्या एका समारंभात निवृत्त डेप्युटी कमिशनर सुधाकर सुरडकर यांच्याहस्ते पुरस्कार सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुकाराम काते, पोलीस महानिरीक्षक आर. तडवी, श्री शिवशक्ती सामाजिक मुंबई यांचे ज्येष्ठ नागरिक रघुनाथ शिरसेकर, गिरणी कामगार नेते भाऊसाहेब पाटील, उरण सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार विलासराव कोळे, गोविंद मोहिते, राजेंद्र काटे,अँड.अच्युत पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतक विभागीय नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संगीता राऊत यांचे राजकीय, शैक्षणिक ,सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.
Post a Comment