नगरपरिषद ते महानगरपालिका कार्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेचा निरोप : ६ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त
पनवेल : महापालिकेतील सेवेमध्ये असणारे उपमुख्य लेखा अधिकारी विनयकुमार पाटील, सहाय्यक आयुक्त हरिश्चंद्र कडू,अधिक्षक विजय कोळी, अग्निशमन विभाग प्रमुख अनिल जाधव,अग्निशामक अनंता गायकवाड, सफाई कामगार शांताराम तांबे यांचा निरोप समारंभ आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यात आला.
यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त नामदेव पिचड, प्रभाग समिती अ,ब,क,डचे प्रभाग अधिकारी,भांडार विभागप्रमुख प्रकाश गायकवाड, जन्म मृत्यू विभाग प्रमुख हरेश जाधव यांनी व महापालिका अधिकारी, कर्मचारी, निवृत्त अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.यावेळी त्यांना पुष्पगुच्छ ,शाल, प्रशस्ती पत्रक,भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.उपमुख्य लेखाधिकारी विनय पाटील यांनी रायगड जिल्हा परिषद, शिक्षण,आरोग्य, बांधकाम,पंचायत समिती , जिल्हा कोषागार कार्यालय,या ठिकाणी काम केले होते. याचबरोबर गेल्या दोन वर्षापासून पनवेल महानगरपालिकेत ते प्रतिनियुक्तीवरती उपमुख्य लेखा परिक्षक म्हणून काम करत होते.
सहाय्यक आयुक्त हरिश्चंद्र कडू हे नगरपरिषद काळात जकात नाका कारकून म्हणून सेवेत रूजू झाले होते. महापालिका झाल्यानंतर प्रभाग ड प्रभाग अधिकारी, कर वसुली, स्थानिक संस्था कर अशा विविध विभागामध्ये त्यांनी काम करताना महत्वाचे योगदान दिले. सेवा काळात 2005 सालच्या पूर परिस्थितीत तसेच कोरोना काळात त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली.नगरपरिषद काळापासून कार्यरत असलेले अग्निशमन विभाग प्रमुख अनिल जाधव यांनीही आपल्या सेवा काळात पालिकेला भरीव योगदान दिले.आग असो किंवा पूर, इतर कोणत्याही आपत्ती काळात अग्निशमन विभागाची महत्वाची भूमिका असते. महापालिका क्षेत्रात कोणत्याही ठिकाणी अचानक आपत्ती आल्यास वेळेची तमा न बाळगता अनिल जाधव यांनी आपली सेवा देऊन त्या आपत्तीवर निवारण केले आहे.याचबरोबर अधिक्षक विजय कोळी, अग्निशामक अनंता गायकवाड, सफाई कामगार शांताराम तांबे यांनीही महापालिकेच्या सेवा काळात दिलेले मौल्यवान योगदान दिले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये धीर गंभीर वातावरणात या अधिकारी –कर्मचाऱ्यांना निरोप देताना त्यांच्या कुटूंबियांनी तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळातील आठवणी सांगून पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment