नवीन पनवेलच्या अत्रे कट्ट्यावर 'असंच जगू या छान' ...
पनवेल- नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यावर 'असंच जगू या छान' याअंतर्गत योग-आरोग्य-आहार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तुम्हीच व्हा स्वतःचे डॉक्टर .. कुठल्याही तपासणी शिवाय हे जाणून घेण्यासाठी सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ व आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंकांचे संपादक डॉ.हेमंत जोशी व डॉ.अर्चना जोशी यांचे योग-आरोग्य-आहार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिन.४ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवीन पनवेलच्या सेक्टर ११ मधील सिडको गार्डन, सिनेराज थिएटर जवळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानास सर्वांनी उपस्थित रहावे असे संयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment