News Breaking
Live
wb_sunny Jun, 7 2025

१ जून ... वाढदिवसांचा दिवस ... नेत्यांपासून ते सामान्य माणसापर्यंत ..

१ जून ... वाढदिवसांचा दिवस ... नेत्यांपासून ते सामान्य माणसापर्यंत ..

पनवेल - १ जून  ... खऱ्याअर्थाने वाढदिवसांचा दिवस! मग तो नेत्याचा असो वा सामान्य माणसाचा! त्यांच्यासाठी तो आनंदाचा दिवस ..जल्लोषाचा दिवस.. शुभेच्छांचा वर्षाव करणारा दिवस ..जो तो आप-आपल्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करतात.
पनवेल,उरण, रायगड, नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, कामगार नेते,सरपंच ते अगदी सामान्य माणूस आपला या दिवसाचा वाढदिवस विविध समाजोपयोगी, विकास कार्यक्रम-उपक्रमांनी साजरा करतात.मग कोणी विकास कामांची उद्घाटने, शैक्षणिक, क्रीडा तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिष्टचिंतन समारंभाद्वारे वाढदिवस साजरा करतात.वाढदिवसाचे बॅनर अगोदरच झळकू लागतात.आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे मग कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळतात. सोशल मीडियाचाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो,याद्वारेही शुभेच्छा दिल्या जातात.जाहीरपणे लावलेल्या वाढदिवसाच्या फलकातून कार्यकर्त्यांना आनंद मिळतो. 
महाडचे आमदार भरत गोगावले, उरणचे माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना पनवेलचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, उद्योजक आत्माराम पाटील,  उद्योजक कान्हाशेठ ठाकूर,आदईचे सरपंच रमाकांत गरुडे, कळंबोली शहर भाजपा अध्यक्ष रवीशेठ पाटील,गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत यांच्यासह लोकप्रतिनिधी,सरपंच, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शैक्षणिक-सामाजिक- सांस्कृतिक क्षेत्रातील असंख्य आणि असंख्य जणांचे आज वाढदिवस असल्याचे दिसतात.
पनवेल,उरण,रायगडसह नवी मुंबई आजच्या दिवसाला अनेक जणांचे वाढदिवस आहेत.रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या वाढदिवसानिमित्त शेलघर-उलवे येथे स्व.प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या सदाबहार गीतांची मैफिल आयोजित केली आहे.याप्रसंगी सिद्धिविनायक ब्लँकेट हॉलचे उद्घाटन ठेवण्यात आले आहे.
आदई ग्रामपंचायतीचे सरपंच रमाकांत गरुडे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्ताने १ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता आदई ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन त्याचबरोबर आधारकार्ड शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. यांच्याबरोबर अनेक जणांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment