News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिका हद्दीत बिना परवानगी बॅनर बाजी करणाऱ्यांना भरावे लागणार लाखोंचे दंड : महापालिकेने बजावल्या नोटीस

पनवेल महानगरपालिका हद्दीत बिना परवानगी बॅनर बाजी करणाऱ्यांना भरावे लागणार लाखोंचे दंड : महापालिकेने बजावल्या नोटीस

पनवेल - पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृतपणे बॅनर, होर्डिंग्ज व भिंतीपत्रके लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा पवित्रा पनवेल महानगरपालिकेने हाती घेतला असून, या संदर्भातून अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्यांवर नोटीस बजावण्यात आल्या आहेत तसेच फौजदारी कारवाईसाठी मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ व मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी (२६ नोव्हेंबर २०१५) रोजीच्या कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आले आहे.  

पनवेल महानगरपालिका हद्दीत, पनवेल महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता अनेक भिंतीपत्रके व बॅनर लागल्याचे निदर्शनास आलेले आहेत. त्यामध्ये प्रहार अकॅडमी, सिटी बाईक्स पॉईंट, कमांडो करिअर अकॅडमी, परी. स्कुल (किड्स क्लब), मातोश्री हॉस्पिटल आदी व्यावसायीक संस्थांचा सहभाग आहे.  


मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ व मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी (२६ नोव्हेंबर २०१५) रोजीच्या आदेशान्वये स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेवर/ विद्युत पोलवर पूर्व परवानगी न घेता बॅनर्स, पोस्टर्स, फलक, डिजिटल फ्लेक्स, कमानी इत्यादी जाहिराती करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर कायद्यामध्ये अशा अनधिकृतपणे जाहिरात करणाऱ्यावर संस्था चालकावर फौजदारी कारवाई करण्याची  तरतूद आहे. असे असतानाही व्यावसायिक संस्थांनी नियमांचे उल्लंघन करून  आपल्या व्यावसाईक प्रसिद्धीसाठी अनाधिकृतपणे  बॅनरबाजी केली जात आहे. या संदर्भात महानगरपालिकेने रीतसर नोटीस देऊनही प्रहार अकॅडमी, कमांडो करिअर अकॅडमी व प्रिया न्यु बॅंक जॅाबने दंडाची रक्कम भरली नसल्याने त्यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता (एफआयआर) दाखल करण्यात आली आहे. तसेच  सिटी बाईक्स पॉईंट, प्री . स्कुल (किड्स क्लब), मातोश्री हॉस्पिटल यांना नोटीसी बजावण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५, मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये कडक कारवाई करण्याचे निर्देश पनवेल महापालिकेने दिले आहेत. 

 दंड लावण्यात आलेल्या संस्थेचे नाव व रक्कम 
1)  प्रहार अकॅडमी, तक्का-पनवेल - ( दंड रक्कम - 2 लाख 94 हजार रुपये )
2)  सिटी बाईक्स पॉईंट, तक्का-पनवेल - (दंड रक्कम - 1 लाख रुपये )
3)  मातोश्री हॉस्पिटल, पनवेल - ( दंड रक्कम -67 हजार 200 रुपये  )
4)  प्री. स्कुल (किड्स क्लब, पनवेल )- (दंड रक्कम -22 हजार 800 रुपये )
5)  कमांडो करिअर अकॅडमी, तक्का-पनवेल - (दंड रक्कम - 10 हजार रुपये )
6)  प्रिया न्यू बॅंक जॅाब, मुलूंड - ( दंड रक्कम - 10 हजार रुपये  )

पालिका क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे बॅनरबाजी करणे नियमबाह्य असल्याने अशा व्यवसायिकांवर नियमानुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जात आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ज्या व्यवसायीकांना प्रसिद्धी करायची आहे त्यांनी अधिकृतपणे महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. 
          रोशन माळी,प्रभागअधिकारी -ड

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment