वयोवृद्धांपासून ते चिमुकल्यांपर्यंत मोबाईलच्या विळख्यात ...
पनवेल -(बाळासाहेब गणोरकर) : वयोवृद्धांपासून ते चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाइलचा लळा लागला आहे. मोबाइलचा अतिवापर होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणात मोबाईलमध्ये अडकली आहे.तसेच लहान मुलांनासुद्धा मोबाइलचे व्यसन लागले आहे तर नागरिकांना तर मोबाइल जीव की प्राण झाला असल्याने अनेकांचा जीव त्या मोबाइलमध्ये अडकल्याने सतत लक्ष मोबाइलमध्ये असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही वर्षात संवादाचे माध्यम असलेला मोबाइल या मोबाइलच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. सध्या घरोघरी टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप आदी वस्तू दैनंदिन कामकाजासाठी वापरल्या जातात. मोबाईलमुळे अनेक कामे सोपे होतात,अनेक प्रकारची माहिती मोबाईलमध्ये गुगलवर मिळते त्यामुळे मोबाईल चांगला पण तितकाच वाईट आहे. तर लहान मुलांना सुरुवातीला रडू नये म्हणून सहज दिलेला हातात मोबाइल आता सवयीचा भाग झाला आहे. लहान मुलांना रडू नये म्हणून मोबाइल हातात देऊन शांत करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही मुले मोबाइलमध्ये गेम खेळताना दिसत आहेत. स्मार्ट फोनमध्ये नवनवीन बदल झाले असून अनेक गेम यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. यातील तरुणांचा कर्दनकाळ ठरलेल्या अनेक गेमच्या विळख्यात अनेक मुले आणि नागरिक सापडले आहेत.मोबाइलवर लुडोसारखे अनेक गेम खेळताना नागरिक व मुले दिसत आहेत, त्यामुळे जवळ असूनसुद्धा जवळच्याला बोलायला वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.शहरी भागात अगोदर पासूनच मुलांच्या हातात मोबाईल होता.मात्र कोरोना काळात सगळीकडे ऑनलाईन शिक्षण चालू झाले होते तेव्हापासून ग्रामीण भागातही मोबाईल मुलांच्या हातात जास्त प्रमाणात आले आहेत.त्यामुळे आता सतत मोबाईल मुलांना हातात ठेवावा वाटत असल्याचे चित्र आहे. जवळ जवळ प्रत्येक घरात प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. सध्या सर्वांचा जीव की प्राण मोबाईल झाल्याचे चित्र दिसत आहे. सर्वांच्या हातात सतत मोबईल दिसण्याचे प्रमाण वाढत आसल्याने ज्येष्ठ नागरिक माणसं माणसाजवळ असूनसुद्धा दूर असल्या सारखे वाटेल अशी भिती व्यक्त करीत आहेत.
Post a Comment