News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायाला अतिक्रमण! अन् परप्रांतीयावर मेहरबानी? पनवेल महानगरपालिकेच्या या भूमिकेवर स्थानिकांची नाराजी

स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायाला अतिक्रमण! अन् परप्रांतीयावर मेहरबानी? पनवेल महानगरपालिकेच्या या भूमिकेवर स्थानिकांची नाराजी

पनवेल : पनवेल शहरातील मोक्याच्या ठिकाणी अनेक परप्रांतीयांसह नारळासह सरबत विक्रेत्यांनी शासनासह हॉस्पिटल परिसरातील मोक्याच्या जागा अडवल्याने संताप पनवेलकरांनी व्यक्त केला आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायाला अतिक्रमण विभाग तातडीने कारवाई करते तर या परप्रांतीयावर का मेहरबानी असा सवाल पनवेलकर करीत आहेत. पनवेल महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण मोहीम सर्वत्र चालू असताना पनवेल शहरात या मोहिमेला अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. 

या फेरीवाल्यांनी मुख्यतः नारळपाणीवाल्यांनी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल तालुका पोलीस ठाणे समोरील शासकीय जागा, विविध रुग्णालय परिसर तसेच तहसीलदार कार्यालय परिसर, गुणे हॉस्पिटल, प्राचीन हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल, पनवेल कोर्ट मुख्य समोरील फुटपाथवर, तक्का येथे जाणाऱ्या बायपास रोडवर, दुर्गामाता मंदिर शेजारी या ठिकाणी परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले.त्यामुळे या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांच्या कागदपत्रांची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment