पनवेल तालुक्यात ७ पूरग्रस्त तर ३ गावे दरडग्रस्त :आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार
पनवेल -पनवेल तालुक्यातील ७ पूरग्रस्त तर ३ गावे दरडग्रस्त आहेत. सदरची परस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्तीवर मात करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.
पनवेलमध्ये सरासरी दरवर्षी २ हजार ८२४ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र गेली काही वर्षे पावसाळ्यात सातत्याने महापूर येऊन काही गावांमध्ये नदीचे पाणी शिरून घरातील सामानांचे मोठे नुकसान होत असते. तर डोंगराच्या पायथ्याशी घरे असलेल्या कुटुंबांना दरडीचा धोका पावसाळ्यात निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. पनवेल तालुका प्रशासनाने तालुक्यातील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. पूरग्रस्त दरडग्रस्त आणि खाडीकिनाऱ्यावरील गावांमध्ये पावसामुळे जवळपास ६०० हून अधिक कुटुंबे व साडेपाच हजार नागरिक
सात गावांमध्ये पाणी शिरून नुकसान होणाऱ्या गावांमध्ये आपटा, चिपळे, करंजाडे, पारगाव- पारगाव डुंगी, दापोली भंगारपाडा, पालीदेवद-शीलोत्तर रायचूर, भिंगारीपाडा-काळुंद्रे यांचा समावेश आहे ,तर दरडग्रस्त गावांमध्ये चिंचवाडी धोदानी, सतीचीवाडी मालडुंगे आणि धोदाणी या गावांचा समावेश आहे.बाधित होत असल्याची आकडेवारी देण्यात आली आहे. तहसील विभागातर्फे त्यांच्या स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
पनवेलमध्ये तालुका आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत बैठक घेण्यात आली आहे व आराखडा तयार करण्यात आला आहे. पूरग्रस्त गावासंदर्भात सिडकोला कळवलेले आहे. दरडग्रस्त तीन गावे ही कमी धोका असलेली आहेत. एक जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू होत आहे
- विजय तळेकर (तहसीलदार) , पनवेल
■ पारगाव येथे सिडकोने केलेल्या भरावामुळे ग्रामस्थांच्या घरात पाणी जाऊन नुकसान होते. स्थलांतरासाठी आपटा गावातील नागरिकांसाठी राजीप शाळा आपटा, करंजाडे, पारगाव डुंगी आणि दापोली भंगारपाडा यांच्यासाठी राजीप शाळा सिडको करंजाडे, भिंगारीपाडा काळुंद्रे यांच्यासाठी राजीप प्राथमिक शाळा काळुंद्रे येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
खाडी किनाऱ्यावरील वडघर, करंजाडे, कच्छी मोहल्ला पनवेल ही गावे आहेत. त्यांना अनुक्रमे स्थलांतरासाठी प्राथमिक शाळा वडघर पुनर्वसन मराठी शि. चिंचपाडा, राजीप शाळा सिडको करंजाडे, आणि पीर कमरअली शहा मनपा शाळा क्र. ६ येथे पर्यायी ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.
Post a Comment