News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बाहुला-बाहुलीचे' लग्न : नवीन पनवेलच्या फडके विद्यालयाचा उपक्रम

बाहुला-बाहुलीचे' लग्न : नवीन पनवेलच्या फडके विद्यालयाचा उपक्रम

नवीन पनवेल-'बाहुला-बाहुलीचे' लग्न हा लहान मुलांचा खास आवडीचा कार्यक्रम. मोबाईल, इंटरनेटच्या जगात गुरफटलेल्या आजच्या मुलांना आपली संस्कृती व पारंपरिक खेळ एकतर माहीत नाही किंवा धावपळीत गुंतलेल्या थोरामोठ्यांनाही त्यांना हे सांगायला वेळ नाही. या जुन्या आठवणींची नव्याने ओळख  मएसो संचलित आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाने करून दिली. 

 विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागामार्फत बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे आयोजन विद्यालातील सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी बालकांसमवेत पालकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या समारोपप्रसंगी या लुटुपुटीच्या लग्नाचा बेत आखला गेला. ठरलेल्या मुहूर्तावर सजलेले वर-वधू तयार झाले. बच्चेकंपनी आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ मंडळीही आकर्षक पारंपरिक वस्त्र परिधान करून लग्नात सहभागी झाले. बालजगतच्या परिसरातून थाटात बाहुल्या वराची वरात काढण्यात आली. तिकडे वधू झालेली बाहुलीही नवरीच्या वस्त्रात तयार होऊन वाट पाहत होती. वरात मांडवात पोहचली तसे वर-वधूला खुर्चीवर बसवण्यात आले. भटजींनी मंगलाष्टक म्हणून लग्नाचा धुमधडाका वाजविला आणि  व्हराडीनीही आपल्या हातातील अक्षता वधू-वरावर टाकल्या.
या खेळातून पुढील जीवनासाठी आवश्यक असलेली अनेक कौशल्य अनेक बाबींचा सराव मुलांना मिळत असतो. हातांचा कौशल्यात्मक विकास तर विचार प्रक्रियेमुळे मेंदूचा विकास होण्याकरिता अशा खेलांमधून अधिक वेगाने घडतो. यातून कठीण परिस्थितीतही सगळं व्यवस्थित करण्याची, वेळ निभावून नेण्याची उपजत वृत्ती अंगीकारलेली जाते. त्यासोबत सहनशीलता, सांघिक भावना, दुसऱ्यासाठी झटणे, नेतृत्व गुण असे कितीतरी गुण या खेळातून लहानपणापासूनच मुलांमध्ये वृद्धिंगत होत जातात. 
अशा विविध खेळांमधून मुलांच्या कलागुणांचा विकास तर होतोच तसेच नवीन पिढीचे संस्कारक्षम मन घडवण्यातही मोठा वाटा उचलला जातो. नवीन पनवेल येथील फडके विद्यालय मागील २४ वर्षे अशाच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण  विकास घडविण्यात मोलाचं वाटा उचलत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment