पनवेल मालमत्ताकर विरोधातील खारघर फेडरेशनची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
पनवेल : माननीय उच्च न्यायालयात खारघर कोपरेटिव्ह हौसिंग सोसायटिज फेडरेशन लिमिटेडच्यावतीने महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात रिट पिटीशन दाखल केली होती.आज माननीय उच्च न्यायालयात न्यायमूर्ती जी.एस.कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर.एन.लड्डा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. यावेळी माननीय न्यायालयाने ही याचिका फेटाळण्यात आल्याचा निकाल दिला.
मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस हरकत घेत खारघर को. हौसिंग सोसायटिज फेडरेशन लिमिटेडच्यावतीने ( याचिका क्र. 8586/ 2021)महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात रिट पिटीशन दाखल केली होती. याबाबतीत न्यायालयामध्ये वेळोवेळी सुनावण्या झाल्या होत्या. दिनांक 30 मार्च रोजी याबाबतीत मा.उच्च न्यायालयात या याचिकेवरती दोन्ही बाजूंनी वाद प्रतिवाद करण्यात आला होता. महापालिकेच्यावतीने जेष्ठ विधीज्ञ ॲङ आशितोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली होती. तसेच ॲङ केदार दिघे यांनी या याचिकेमध्ये पालिकेच्याबाजूने विधीज्ञ म्हणून काम पाहिले होते.
या याचिकेवरती मा.न्यायमूर्ती महोदयांनी “ही याचिका विचारात घेता येणार नाही तसेच ही याचिका कायद्यात किंवा तथ्यावर टिकू शकत नसल्याने (not entertainable and not maintanable) याचिका फेटाळण्यात येत असल्याचा निकाल दिला”.
महापालिकेचा मालमत्ताकर हा शहराच्या विकास कामासाठी असल्याने मालमत्ता कर भरणे अनिवार्य आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरून शहराच्या विकासास हातभार लावावा असे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी केले आहे.
Post a Comment