News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

संप काळात पनवेलमध्ये उत्पन्न, जात व इतर दाखले आॕफलाईन देण्याची व्यवस्था करावी : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

संप काळात पनवेलमध्ये उत्पन्न, जात व इतर दाखले आॕफलाईन देण्याची व्यवस्था करावी : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

       पनवेल- कर्मचाऱ्यांच्या संप काळात विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले व इतर दाखले आॕफलाईन देण्याची व्यवस्था करावी, असे निवेदन पनवेलचे निवासी नायब तहसिलदार संभाजी शेलार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले.

सरकारी व निम शासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी १४ मार्च पासून सरकारी व निम शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला जुनी पेन्शन ची मागणी करणारे सरकारी व निम शासकीय कर्मचारी यांनी पाठिंबा दिला आहे. 

सध्या आरटीई प्रवेश प्रकिया चालु आहे. खुल्या प्रवर्गातील पालकांना यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असते. तसेच १२वीच्या विद्यार्थ्यांना जेईई व निट परिक्षा देण्यासाठी उत्पन्नाचा दाखला व इतर दाखल्यांची आवश्यकता असते. 

याप्रसंगी पनवेलचे माजी नगराध्यक्ष तसेच  पनवेल व नविन पनवेलचे अध्यक्ष सुनिल मोहोड, पनवेल तालुका कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, खांदा काॕलनी विभाग अध्यक्ष, माजी नगरसेवक सुनिल नाईक, पनवेल व नविन पनवेलचे उपाध्यक्ष विश्वजित मारवाह, पनवेल व नविन पनवेलचे उपाध्यक्ष दिपक बताले, पनवेल व नविन पनवेलचे सचिव संजय परब आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment