जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ८ मार्च रोजी आयोजन
अलिबाग :- शासनाच्या दि.26 सप्टेंबर 2012 परिपत्रकान्वये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि माहे मार्च 2023 मधील पहिल्या सोमवारी दि.6 मार्च 2023 रोजी होळी निमित्त जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे व त्यानंतर मंगळवार, दि.7 मार्च 2023 रोजी धुळीवंदननिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे.
त्यामुळे माहे मार्च 2023 मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन बुधवार, दि.8 मार्च 2023 रोजी दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या लोकशाही दिनासाठी नमूद केल्याप्रमाणे त्या दिवशी व त्यावेळी आपण स्वत:आपल्या कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या अर्जाच्या अद्यायावत माहितीसह उपस्थित राहावे, प्रतिनिधी पाठवून नये, असे प्र.तहसिलदार (संगायो) जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड गोविंद वाकडे यांनी कळविले आहे.
Post a Comment