News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नवीन पनवेलमध्ये ज्ञानाची गुढी ...

नवीन पनवेलमध्ये ज्ञानाची गुढी ...


नवीन पनवेल । नवीन पनवेलच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी.डी.विसपुते बी.एड., एम.एड. महाविद्यालयाच्या वाचनालयात गुढीपाडव्यानिमित्त ज्ञानाची गुढी उभारण्यात आली होती.
         गुढी पाडव्याला घरोघरी दरवर्षी पारंपारिक गुढी उभारून मराठी वर्षाचे स्वागत केले जाते. यंदा राज्यात मोठ्या उत्साहात गुढी पाडव्याचा सण साजरा केला गेला. संकट नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो त्याला एकजूटीने लढा देण्याची मानवी वृत्ती असते. जेव्हा अशा लढ्यास संशोधनाची जोड मिळते, तेव्हा खर्‍या अर्थाने ती विजयाची गुढी ठरते. याचे कोरोना महामारी हे उदाहरण आहेच मात्र ही विजयाची गुढी, ज्ञानाच्या गुढीवर आधारलेली आहे. ज्ञानामुळे माणूस अन् समाज समृध्द होतो. ज्ञानप्राप्तीची साधनं पुस्तक असतात. याच पुस्तकाच्या सहाय्याने अनेक अशक्य गोष्टी शक्य करता येतात....
         हा नवा विश्वास ज्ञानाच्या मदतीने नवीन पनवलेेच्या आदर्श समुहातील विद्यार्थ्यांमध्ये वृध्दिंगत व्हावा, ज्ञानाची ओढ त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या हेतूने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी.डी.विसपुते बी.एड.,एम.एड. महाविद्यालयात आदर्श समुहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगिता विसपुते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या अ‍ॅड.डॉ.सीमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 4 वर्षांपासून गुढीपाडव्याच्या शुभमुहर्तावर ज्ञानाची गुढी उभारण्यात येते व एक नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतो.  
या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली जाते, पुस्तकांचे महत्व त्यांना सांगितलं जातं आणि या मोबाईलच्या काळात पुन्हा एकदा त्याना वाचक बनविण्याचा प्रयत्न केला जातो. याप्रसंगी प्राचार्या  डॉ. सीमा कांबळे  यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची महती गात विद्यार्थी जीवनातील ज्ञानाच्या गुढीचे महत्व विशद केले व सर्वांना एक नवी दिशा दाखवली. 
        या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथपाल प्रिया सागरे, सहाय्यक ग्रंथपाल निलम कदम, ग्रंथालय सदस्य प्रा. विनायक लोहार, प्रा. नेहा म्हात्रे, प्रा. अमिना शेख, परिमला कारंजकर, योगेश ठोकळ आणि संजय सुरवाडे या सर्वांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
         या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने डी. डी. विसपुते बी.एड.,एम.एड.महाविद्यालयाने एक आगळा वेगळा पायंडा घातला आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेलने उभारली आहे. ही ज्ञानाची गुढी अर्थात पुस्तकांची गुढी नवीन वर्षाच्या ज्ञानदायी शुभेच्छा!  वाचत रहा आणि इतरांनाही वाचनाची प्रेरणा देत रहा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment