पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल पाटील
पनवेल- दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेब संस्थापक अध्यक्ष असलेल्या पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी दि.बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.पनवेल-उरण आगरी समाज मंडळाची सभा झाली त्या सभेत ही निवड करण्यात आली.
सदरची सभा पनवेलच्या महात्मा फुले सभागृहात झाली. या निवडीमध्ये मंडळाच्या उपाध्यक्षपदी जे.डी.तांडेल, कोषाध्यक्ष अनंतराव पाटील,सचिव बी.पी म्हात्रे, सहसचिव विजय द.गायकर, कार्यकारणी सदस्य चेतन साळवी, काशिनाथ गोंधळी, धनंजय गोंधळी, कमलाकर पवार, जितेंद्र म्हात्रे, मेघनाथ तांडेल, सदस्या सौ.मेघा तांडेल, सौ. मनस्वी पाटेकर, सौ.मनीषा तांडेल, सौ. अनिता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
Post a Comment