गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीची पनवेलमध्ये भव्य शोभायात्रा
पनवेल - गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समिती,पनवेल यांच्यावतीने पनवेलमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक २२मार्च २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही शोभायात्रा वडाळे तलाव येथून सुरू होणार असून शोभायात्रेचा मार्ग श्री जाखमाता गावदेवी मंदिर- प्रांत ऑफिस- छत्रपती शिवाजी महाराज मार्ग- विरपाक्ष मंदिर- जय भारत नाका- टिळक रोड- सावरकर चौक येथे समाप्त होणार आहे.
या भारतीय नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शोभायात्रेत पारंपारिक वेषात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन नववर्ष स्वागत समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment