पनवेलमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन व राहुल गांधींच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम
पनवेल: काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणा-या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन व राहुल गांधींच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.
संसदेत प्रश्न विचारणे गुन्हा? , अदानीबाबत चौकशी करण्यास सांगणे गुन्हा? असा सवाल करीत 'देश लुटणाऱ्या प्रवृत्तींवर टीका करणाऱ्यांचे आवाज बंद करण्याच्या कुटील प्रयत्नांचा तीव्र निषेध, तीव्र धिक्कार! अशा शब्दात नागरी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी 'नही चलेंगी नही चलेंगी हुकुमशाही नही चलेंगी!, राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है!', भाजप सरकारचा निषेध असो!, मोदी सरकार हाय हाय ! अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. मोदी सरकार केवळ विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते पायदळी तुडविण्याचा प्रकार भाजपा करत आहे. काँग्रेस नेत्यांवर भाजपा नेत्यांनी अनेक बिनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यामुळे अशाप्रकारे भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी यांना शिक्षा होऊ शकते, अशी प्रतिक्रिया पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सुदाम पाटील, कॅप्टन कलावत, नंदराज मुंगाजी, सुरेश पाटील, अखिल अधिकारी, बबन केणी, निर्मल म्हात्रे, सुनील सावर्डेकर, डॉ.धनंजय क्षीरसागर, हेमराज म्हात्रे, शशिकला सिंह, ऍड.अरुण कुंभार, सुधीर मोरे, नित्यानंद म्हात्रे, डॉ.अमित दवे, प्रितेश साहू, अमित लोखंडे, राहुल जानोरकर, किरण तळेकर, भारती जळगावकर, कांती गंगर, डॉ.स्वप्नील पवार, राकेश जाधव, विजय केणी, अरुण ठाकूर, आरती ठाकूर, नीता शेनॉय, ललिता सोनावणे, गोविंद लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासह शुक्रवारी पनवेलमध्ये काँग्रेस पक्षातर्फे खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल निदर्शने करण्यात आली. राहुल गांधीं यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभेत झाला. अध्यक्षांच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपाने हा निर्णय करून घेतला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. सदर घटना लोकशाहीला घातक परिणाम करणारी असल्याची टीका करीत सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच केंद्र तथा मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवनाशेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
Post a Comment