News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

उलवे नोड येथे बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

उलवे नोड येथे बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

      नवी मुंबई :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  विभागीय आयुक्तालय, मुंबई विभाग व स्वमन स्पेशल हयूमन राईटस कौन्सिल मुंबई  याच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत उलवे येथील शगुन बॅंक्वेट हॉल, शगुन बसस्टॉप समोर, बामणडोंगरी रेल्वेस्टेशन जवळ, सेक्टर -19 उलवे नोड नवी मुंबई येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपआयुक्त कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी दिली. 
         या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार असून या मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या  10 वी पास/नापास, 12 वी.आय.टी.आय, पदवी, पदविका, पदवीधर, अभियात्रिकी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उदयोजकांच्या आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार (मागणीनुसार) उमेदवारांची निवड केली जाईल.
           मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी इच्छूक‍ उमेदवारांनी या विभागाच्या https://mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलला भेट देऊन आपली  नोंदणी व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे.  स्वतः चा बायोडाटा आणि शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांसह मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई विभाग कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपआयुक्त  शा.गि.पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment