नवीन पनवेल येथे होणार पहिली डाक अदालत
पनवेल : नवीन पनवेल पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र, पनवेल यांच्यावतीने १५ मार्च २०२३ रोजी नवीन पनवेल मुख्य डाकघर, दुसरा मजला येथे पहिली डाक अदालत आयोजित केली आहे.
मालेगाव, नाशिक, नवी मुंबई, पालघर, रायगड, ठाणे विभागांच्या डाक सेवांशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल.
विशेषतः टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी. देशामधील पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे.
मात्र, तरीही सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. या तक्रारींचा न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Post a Comment