News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सईद मुल्ला यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रेरणामूर्ती पुरस्कार

सईद मुल्ला यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रेरणामूर्ती पुरस्कार

        पनवेल -  पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल-प्रेरणामूर्ती पुरस्कार हा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा येथे प्रदान करण्यात आला.
       गोवा येथे भारत भूषण लाईव्ह चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील साहित्यिक, सामाजिक, उद्योजक, पत्रकारिता, राजकीय आदी क्षेत्रातील अलौकिक कार्य करणार्‍या आदर्श व्यक्तीमत्वांना गोव्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
            हा पुरस्कार म्हणजे 
            जनतेचे प्रेम - सईद मुल्ला
            मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझ्यावरील जनतेचेे प्रेम असल्याचेे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांनी व्यक्त केले. भरीव समाजकार्य, अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, 15 वर्ष लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदांवर मी काम केले असून नगराध्यक्षपदाचा काळ हा माझ्यासाठी सुवर्णकाळ होता. माझा महाराष्ट्राबाहेर सत्कार होतो याचा मला अभिमान आहे. पुरस्कार म्हणजे उत्तेजन आणि माझ्यासाठी उर्जा आहे. समाजासाठी आणखी भरीव काम करण्याची यातून मला प्रेरणा मिळेल असे सांगून समाजात ज्या अप्रकाशित व्यक्ती, संस्था आहेत त्यांचाही गौरव झाला पाहिजे अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
             सईद मुल्ला यांनी, रायगड मुस्लिम वेलफेअर ऑर्गनायझेशन, कोकण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, पनवेल नवी मुंबईच्या अंजुमन ख इस्लामचे ए.आर.कळसेकर अभियांत्रिकी महाविद्याल, गझल पनवेल, अनेक सामाजिक राजकीय मंच आणि एनजीओच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी सातत्याने आपण प्रयत्नशिल, पनवेल नगरपरिषदेत असताना 1986 मध्ये सामाजिक दंगल शांततेने सोडवण्यासाठी सहभाग, पनवेलचे नगरसेवकपदाचे माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमाद्वारे जनसेवा,  1991-93 मध्ये पनवेल नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य अलौकीक, कोविड-19 महामारीच्या काळात विशेष समाजकार्य अनेक कुटुबांचे आधारवड, पनवेल शहराच्या शांततेसाठी आणि सण आणि धार्मिक उत्सवादरम्यान सामाजिक सलोखा राखण्याचे प्रयत्न, पनवेल नगरपरिषदेचे 3 वेळा निवडून आलेले नगरसेवक म्हणून जनतेची सेवा, 2005 च्या महापुराच्यावेळी पनवेलकरांना मदतीचा हात असे त्यांचे सामाजिक योगदान तसेच सामाजिक संस्थांमधून केलेले काम भरीव आहे.
        त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment