पनवेल तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग जाधव
पनवेल - पोलीस पाटील संघाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक पनवेल येथे पार पडली.यावेळी पुढील प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच या बैठकीत पनवेल तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी राज्य संघटक हरिश्चंद्र दुदुस्कर, रा.जि.पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष संतोष दळवी, रा.जि.पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष दिनेश पाटील, सचिव कुणाल लोंढे, चिटणीस विकास पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य पनवेल तालुका पोलीस संघाचे अध्यक्ष मिलिंद पोपेटा, उपाध्यक्ष संतोष गायकर, मिनाक्षी पाटील, सुप्रिया सदावर्ते-मुंगाजी, सुगंधा पारधी, खजिनदार प्रमोद नाईक, विजय खुटले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, कार्याध्यक्ष पनवेल तालुका पोलीस पाटील संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य आदी उपस्थित होते.
Post a Comment