काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची अखिल भारतीय काँग्रेस (AICC) कमिटीवर नियुक्ती
पनवेल - रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली असतानांही पक्षाशी एकनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. महेंद्र घरत यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महेंद्र घरत यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेवून पक्षश्रेष्ठींनी त्यांची नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरु केले कार्य, स्वतः च्या कार्यकर्तृत्वाने आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. मध्यंतरीच्या काळात राजकीय व सामाजिक जीवनात चढउतार आले परंतु न डगमगता कार्यकर्तृत्वावर ते राजकीय व सामाजिक पटलावर आपली छाप पाडण्यात यशस्वी झाले.
राहुल गांधी यांच्या पदयात्रेत रायगड जिल्ह्याची वेगळी छाप पाडण्यात ते यशस्वी झाले. काँग्रेस कोकण मेळावा, ओ. बी.सी. राज्यस्तरीय मेळावा, इंटक राज्य अधिवेशन असे वेगवेगळे उपक्रम यशस्वी करून प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी टाकलेला विश्वास यशस्वी नियोजनाने सार्थ ठरविला व सर्वांची मने जिंकली. त्यांच्या कार्याची पावती म्हणजे महेंद्र घरत यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर झालेली नियुक्ती होय. महेंद्र घरत यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Post a Comment