News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलच्या महिलांनी पाहिला 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला'

पनवेलच्या महिलांनी पाहिला 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला'

पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने महिलांना नाट्य मेजवानी दिली. हरवलेल्या पत्त्यांचा बंगला हे नाटक यावेळेस पनवेलमधील महिलांना दाखवण्यात आले.
         या कार्यक्रमाचे आयोजन जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या ममता प्रितम म्हात्रे यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांनी सहभाग घेतला.

       याप्रसंगी बोलताना ममता प्रितम म्हात्रे म्हणाल्या, जागतिक महिला दिनानिमित्त सर्व घटकांतील महिलांना सोबत घेऊन  सर्वसमावेशक कार्यक्रम करण्याचे आमच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या महिला पदाधिकार्‍यांनी ठरविले होते. "स्वतःसाठी काही क्षण मनोरंजनाचे" या वाक्यानुसार आम्ही आज महिलांच्या तीन पिढ्या म्हणजेच "आज्जी,आई आणि मुलगी" यांच्यामधील रोज घडणाऱ्या  काही घटना  ज्या महिला ज्येष्ठ कलाकार वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर, दीप्ती लेले यांनी "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" यात नाट्य स्वरूपात मांडलेल्या नाटकाच्या प्रयोगाचे आम्ही आयोजन केले होते.      
                       महिलांचा प्रतिसाद पाहून आसन व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे आम्ही या नाट्य प्रयोगाचा दुसरा प्रयोग एकाच दिवशी आयोजित केला. दोन्ही नाट्यप्रयोगाला हजारो महिलांनी उपस्थिती दाखवली. 
         आपल्या पनवेलमधील महिला स्वच्छता दूत, मोची काम करणाऱ्या भगिनी,भाजी विकणाऱ्या मावशी, दूध विक्रेता ताई, माझ्या आबोली रिक्षा चालवणाऱ्या सर्व भगिनी, डॉक्टर,आर्किटेक्ट,पोलीस, स्वयंसेवी संस्था चालविणाऱ्या महिला पदाधिकारी अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रात बिनधास्तपणे वावरत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या या सर्वांनी उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

        यावेळी या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांच्यातर्फे नाट्य प्रयोगाच्या निमित्ताने पनवेलमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. 

         यावेळी बोलताना प्रितम म्हात्रे यांनी सांगितले , आमच्या विनंतीला मान देऊन आज पनवेलमधील सर्व क्षेत्रातील महिला येथे आल्या आहेत. हाच माझा महिलांच्या वतीने महिला दिनानिमित्त आम्हाला मिळालेला मोठा सन्मान आहे असे मी समजतो. यापुढेही कुठल्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास माझी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहील.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment