इंस्टाग्रामची मैत्री : शिक्षक महिलेला पडली महागात
पनवेल । एका शिक्षक महिलेवर बलात्कार करणार्या दोघा आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने अवघ्या बारा तासात जेरबंद केले आहे.
तळोजा पोलीस ठाणे हद्दीत सुरत येथील महिला शिक्षिका वय 21 वर्षे हिची इंस्टाग्रामवरून मैत्री झालेल्या मित्रास त्याच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबई येथे भेटण्यास आली असताना त्या मित्राने तिला तळोजा येथे त्याचे राहणार्या मित्राचे रूमवरती तिला घेवून जावून तेथे तिला बिअर पाजून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले तसेच त्याचे सोबतच्या मित्राने देखील तिच्या शरीराशी असभ्य चाळे करून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
सदर महिलेस संधी मिळताच तिने सदर रूममधून पळ काढून 100 नंबरवर कॉल करून पोलीस मदतीची मागणी केली. परंतु त्यादरम्यान सदरच्या दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला होता.
सदर महिलेस संधी मिळताच तिने सदर रूममधून पळ काढून 100 नंबरवर कॉल करून पोलीस मदतीची मागणी केली. परंतु त्यादरम्यान सदरच्या दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला होता.
सदर पिडीत शिक्षिका महिलेने झालेल्या प्रकाराबाबत तळोजा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करताच अति संवेदनशिल व गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केल्याने नमुद गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक बाबींचा तपास करून गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आयुब इद्रिस खान (21) व शहाबाज जाहिर आली (20) हे त्यांचे मुळगावी रिवा, मध्यप्रदेश येथे रेल्वेने पळून जाणार असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखा कक्ष 2 नेमणूकीतील पोलीसांचे पथक तयार करून त्यांना तात्काळ लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पाठविण्यात आले.
सदरचे आरोपी हे फलाटावरुन मध्यप्रदेश साठी सुटलेल्या रेल्वेने त्यांचे मुळगावी पळुन जात असताना गुन्हे शाखा कक्ष नेमणुकीतील पोलीस हवालदार वाघ, पोलीस हवालदार बैकर व पोलीस नाईक श्री. डोंगरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःचा जिव धोक्यात घालून चालू रेल्वेमध्ये चढून आरोपींचा पाठलाग करून शोध घेवून नमुद गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर ते पुढील स्टेशनवर उतरले.नमुदच्या आरोपींनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी तळोजा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Post a Comment