News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मराठी भाषा दिनानिमित्ताने पनवेल रेल्वेस्थानकात मराठी अभिमान गीत वाजवा - मनसेची मागणी

मराठी भाषा दिनानिमित्ताने पनवेल रेल्वेस्थानकात मराठी अभिमान गीत वाजवा - मनसेची मागणी


पनवेल ।  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिन मोठ्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर पनवेल शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी पनवेल रेल्वे स्थानकात मराठी अभिमान गीत वाजवा अशी मागणी रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.  
                
              महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहरामधील पदाधिकारी यांनी व महाराष्ट्र सैनिकांनी पनवेल रेल्वेस्थानकामध्ये भेट देऊन स्थानकातील अधिकार्‍यांसमवेत विविध विषयांवर चर्चा केली.
पनवेल रेल्वे स्थानकात रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी अभिमान गीताची ध्वनीफीत लावण्यात यावी अशी मागणी शाखा अध्यक्ष अवधूत ठाकूर व महाराष्ट्र सैनिक विशाल चितृक यांनी केली. यावेळी रेल्वेस्थानक व्यवस्थापक यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.

                  याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल शहर अध्यक्ष संजयजी मुरकुटे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष वर्षाताई पाचभाई, उपशहर अध्यक्ष प्रकाश लाड, माथाडी सेना जिल्हाध्यक्ष गौरंग जेठवा, सहकार सेना शहर अध्यक्ष सागर पाटील, महिला आघाडी उपशहर अध्यक्ष योगिताताई गुंजाळ, तक्का विभाग अध्यक्ष शोभा गोरीवले, महाराष्ट्र सैनिक संचित मोरे, अक्षय जोशी, अक्षय जैतपाल, स्नेहल राजमाने व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment