शिरढोणमध्ये गॅस गिझरचे वाटप- वन विभागाचा उपक्रम
शिरढोणमध्ये गॅस गिझरचे वाटप- वन विभागाचा उपक्रम
पनवेल - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत वन्यजीव ठाणे, कर्नाळा पक्षी अभयारण्य अंतर्गत ग्रामपरिस्थितिकिय विकास समिती शिरढोण यांच्यावतीने शिरढोण ग्रामपंचायत हद्दीतील ७६ लाभार्थ्यांना ७५% अनुदानात गॅस गिझरचे वाटप करण्यात आले. शिरढोण ग्रामपंचायतीचे मा. सरपंच तथा ग्रामपरिस्थितिकिय विकास समिती शिरढोण अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
पर्यावरणाचा होणारा र्हास थांबवण्यासाठी वन विभागाच्या सहकार्याने राबवण्यात येणार्या उपक्रमांबाबत ग्रामपरिस्थितिकिय विकास समिती शिरढोण अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी वन अधिकार्यांचे आभार मानले. तसेच गॅस गिझरविषयी उपस्थित लाभार्थ्यांना माहिती दिली. याआधी वन विभागाकडून ग्रामस्थांना ३२५ कुटुंबाना गॅस सिलिंडर, ९८ महिलांना शिलाई मशीनचे देखील वाटप करण्यात आले आहे.
Post a Comment