News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करा - महापालिका बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढू नका ....

नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करा - महापालिका बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढू नका ....

नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करा - पनवेल महापालिका
बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढू नका ....
पनवेल  :  कोरानाचे संकट अजूनही पुर्णपणे संपले नाही. त्यामुळे कोविड १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, यावर्षी १९ फेब्रुवारीला होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून साजरी करावी असे आवाहन महापालिका व पोलिस प्रशासनाच्यावतीने महापालिका क्षेत्रातील शिवजयंती उत्सव मंडळांना व नागरिकांना करण्यात आले आहे. शासनाने शिवज्योत वाहण्याकरिता २०० भाविकांना व शिवजयंती  उत्सवाकरिता ५०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. 
       शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती उत्सव समितीची बैठक ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली होती.
        कोरानाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला,प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचे कार्यक्रम आयोजित करावे त्याठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे.
         शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक शिबीरे ,उपक्रम आयोजित करण्यास शिवजयंती मंडळांनी प्राधन्य द्यावे. मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार व त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. यावेळी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम जसे की मास्क, सॅनिटायझर वापरावे, असे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहे.
       यावेळी उपमहापौर सीताताई पाटील,सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘क’ सभापती संजना कदम नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, चारूशीला घरत नगरसेवक गणेश कडू,  मनोज भुजबळ, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त कैलास गावडे, नवी मुंबई झोन 2 चे उपायुक्त शिवराज पाटील , सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, महापालिका अधिकारी,  सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पवार,  पोलिस विभागचे अधिकारी ,शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य, शहरातील विविध संघटनाचे अध्यक्ष तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment