डॉ. प्रीती महाजन यांची मुंबई विभागीय समन्वयक म्हणून नियुक्ती..
प्रा.डाॅ.प्रीती महाजन यांची मुंबई विभागीय समन्वयक म्हणून नियुक्ती..
पनवेल- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा या उपक्रमांतर्गत सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई विभागासाठी विभागीय समन्वयक म्हणून कळंबोली येथील शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. प्रीती प्रसाद महाजन यांची नियुक्ती झाली आहे.
सदरची नियुक्ती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केली आहे.
माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये करियर कट्टा हा उपक्रम यशस्वी यशस्वीरित्या राबविला जाईल असे डॉक्टर प्रीती महाजन यांनी सांगितले. डॉ. प्रीती महाजन यांच्या नियुक्तीबद्दल महाविद्यालयातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
VERY GOOD
ReplyDeleteVery nice . I think appropriate selection has done by Shitole Sir . Congratulations to MahajanMadam .
ReplyDelete