व्हॅलेन्टाईन्स डे .. साजरा होतोय प्रेमाचा दिवस
व्हॅलेन्टाईन्स डे .. साजरा होतोय प्रेमाचा दिवस
पनवेल - १४ फेब्रुवारी ...व्हॅलेन्टाईन्स डे ....अर्थातच प्रेमाचा दिवस! प्रेम साजरा करण्याचा हा दिवस! या दिवसाचं महत्त्वच आहे की प्रेम साजरे करणे.पाश्चात्य संस्कृती असलेला हा दिवस आज जगभर साजरा केला जातो.
नात्यातील प्रेम ... मग ते नाते कोणतेही असो! ते व्यक्त करणारा हा दिवस. प्रेमीयुगल, युवक-युवती, तरुण नवरा-बायको यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस.आपल्या आयुष्यातील ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे आणि तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्याचा हा दिवस.
हा दिवस आपला आयुष्यातील जोडीदार ,मित्र-मैत्रिणी अगदी आई-बाबा यांच्या सोबत साजरा करण्याचा दिवस आहे. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि मग सहजीवन अशासाठी तर हा खास दिवस. या दिवसाने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
उत्सुकता लागून राहिलेल्या यादिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा देतात.लाल गुलाबांची फुले,चॉकलेट नाहीतर आवडत्या भेटवस्तू देऊन आपल्या नात्यातील प्रेम व्यक्त करतात. लाल रंग प्रतीक मानलेल्या जो- तो आप-आपल्या पद्धतीने शुभेच्छा, भेटवस्तू देऊन हा प्रेम दिवस साजरा करतात.
व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच....
पनवेल - व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच असून त्यामुळे युवक-युवतींचे जीवन धोक्यात आले आहे असे हिंदुत्ववादी संस्थांनी तसेच किर्तनकारांनी मत व्यक्त केले आहे.
शारीरिक आणि मानसिक विकृती निर्माण होऊन त्यांचे आयुष्य वाया जात आहे.रशियातील बेलग्रेड, अमेरिकेतील फ्लोरिडा विश्वविद्यालय, चीन, इटली, स्वीडन, नॉर्थ कोरिया, इथियोपिया आदी देशांत हा दिवस साजरा केला जात नाही; मग भारताच ‘व्हॅलेंटाईन डे’ कशासाठी ?
Post a Comment