चलो सिडको भवन धरणे आंदोलनाचा दिवस ....
चलो सिडको भवन
धरणे आंदोलनाचा दिवस
पनवेल-अखिल भारतीय किसान सभेच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीतर्फे एक दिवसाचे लक्षवेध धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सिडको भवन येथे हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दि. बा.पाटील साहेबांचे नाव देण्यात यावे तसेच विमानतळ प्रकल्पबाधितांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत अशा मागण्या या आंदोलनाच्यावेळी करण्यात येणार आहेत .
या आंदोलनाला स्मार्टभूमिपुत्रांनी आपले अस्तित्व, अस्मितेसाठी या लक्षवेधी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment