News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे केले महापालिका आयुक्तांचे अभिनंदन

पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे केले महापालिका आयुक्तांचे अभिनंदन

पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे केले 
महापालिका आयुक्तांचे अभिनंदन
नवीन पनवेल : रायगडसह कोकणात पहिल्या असलेल्या पनवेल महापालिकेला नुकताच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे, ही पनवेलवासियासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. पनवेल तालुका महासंघाचे जेष्ठ सल्लागार सुनील पोतदार, जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर यांच्या उपस्थितीत पनवेल तालुका महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी त्या संदर्भातील अभिनंदन पत्र सन्माननीय आयुक्त गणेश देशमुख यांना दिले.
              यावेळी बोलताना महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेचे कामकाज विकासात्मक लोकाभिमुखात्मक आहे. आजही महापालिकेच्या माध्यमातून समाजाभिमुख घेतलेल्या विविध निर्णयामुळे महापालिका प्रशासनाच्या  कार्याचा ठसा जनमानसात उमटत आहे, पनवेल महापालिकेने स्वच्छता निर्मूलन, प्लास्टिक बंदी यासह अनेक लोकोपयोगी उपक्रम मोठ्या हिरीरीने पूर्णत्वास नेले आहेत, याची दखल देशाच्या राष्ट्रपती कार्यालयाने घेतली असून पनवेल महानगरपालिकेला पहिला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.         
    यावेळी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांचे विशेष कौतुक करताना रत्नाकर पाटील म्हणाले की, आयुक्त साहेब, आपण केलेल्या मौलिक कामगिरीमुळे पनवेलचे नाव देशपातळीवर निश्चितच उंचावले आहे. त्यामुळे समस्त पनवेलकरांचा ऊर अभिमानाने व स्वाभिमानाने भरून येत आहे, याचे श्रेय आपणास व आपल्या सर्व प्रशासन व  कर्मचारी वर्गास जात असल्याचे त्यांनी आवर्जून अभिनंदन करताना सांगितले. 
       यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा दैनिक रायगड नगरीचे मुख्य संपादक सुनील पोतदार, ज्येष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वाळेकर, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिवसम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी तथा सचिव मयूर तांबडे, दैनिक रामप्रहरचे प्रतिनिधी तथा प्रसिद्धीप्रमुख नितीन देशमुख, दैनिक मुंबई चौफरचे प्रतिनिधी अरविंद पोतदार, दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, दैनिक सकाळचे प्रतिनिधी के. सी.सिंग, दैनिक कृषिवलचे प्रतिनिधी राजेश डांगळेयांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment