ऐन निवडणुकीच्या तोंडावर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश लाड यांचा राजीनामा
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ...
रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश लाड यांचा जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा
पनवेल- रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश लाड यांनी आपल्या जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रकृतीचे कारण देत राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश लाड यांनी दिलेल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनाम्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वांनाच धक्का बसला आहे.
राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी , जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी दिली त्यानंतर कोरोना काळात प्रश्न सोडवण्याचा, न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
येणाऱ्या निवडणुका पाहता माझ्या पायाच्या शस्त्रक्रियेमुळे मला काम करता येणार नाही.यामुळे मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाने , नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला.कमी कालावधीमध्ये मला काम करता आले नाही परंतु संघटना उभी करण्याचा मी प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment