ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महिला विंगचा सिडको प्रशासनावर हल्लाबोल!....तळोजा आणि खारघरमधील पाणीटंचाईवर सात दिवसांचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन
पनवेल - : पनवेल महानगरातील तळोजा फेज १, तळोजा फेज २ आणि खारघर परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर ऑल इंडिया उलमा बोर्ड (महिला विंग)च्या संपूर्ण टीमने रायगड भवन येथे सिडकोच्या जलविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्यांवर आवाज उठवला.
यावेळी सिडकोचे अधीक्षक अभियंता श्री.नानिक चोतानी आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री.चेतन बुध यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन पाणीपुरवठ्यातील अनियमितता, अपुरा दाब आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबाबत जाब विचारण्यात आला.
बैठकीतील प्रमुख मुद्दे आणि AIUB च्या ठोस मागण्या
१. कागदोपत्री पाणी कपात आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील तफावत!
सिडको प्रशासनाकडून केवळ १५ ते ३० टक्के पाणी कपात होत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांना ५० टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कागदोपत्री आकडेवारी न मांडता प्रत्यक्ष परिस्थितीची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका AIUB च्या महिला विंगने मांडली.
या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी CIDCO प्रशासनाला सात दिवसांचा कडक अल्टिमेटम देण्यात आला.
२. शुक्रवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय बदलण्याची मागणी!
शुक्रवारी (जुम्मा) पाणीपुरवठा बंद ठेवल्यामुळे विशेषतः महिला, गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शुक्रवारचा शटडाऊन अन्य दिवशी हलविण्याची मागणी महिला विंगने ठामपणे केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत श्री.नानिक चोतानी आणि श्री.चेतन बुध यांनी शुक्रवारचा शटडाऊन रद्द करून तो अन्य दिवशी हलविण्याचे ठोस आश्वासन दिले.
३. मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन!
AIUB च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर CIDCO च्या अधिकाऱ्यांनी रखडलेल्या धरण आणि विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले. येत्या सात दिवसांत पाण्याचा दाब आणि पाणीपुरवठ्यात सुधारणा दिसून येईल, तसेच मार्च २०२७ पर्यंत तळोजा परिसर पूर्णपणे टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
AIUB महिला विंगचा CIDCO प्रशासनाला स्पष्ट इशारा!
ही बैठक केवळ औपचारिकता नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सात दिवसांच्या आत दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, तर ऑल इंडिया उलमा बोर्ड (महिला विंग) गप्प बसणार नाही. नागरिकांच्या पाण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून रास्ता रोको, CIDCO घेराव यांसारखे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी CIDCO प्रशासनाची असेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
बैठकीला उपस्थित AIUB पदाधिकारी
- कुलसुम मस्तान शेख – रायगड जिल्हाध्यक्ष, महिला विंग
- झिमत पोते – रायगड जिल्हा उपाध्यक्ष, विद्यार्थी विंग
- शमा खान – तळोजा प्रभाग अध्यक्षा, महिला विंग
- हसीना बेगम – तळोजा प्रभाग उपाध्यक्षा, महिला विंग
- तसेच ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महिला विंगमधील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ऑल इंडिया उलमा बोर्डची ठाम भूमिका : .....
पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, उपकार नाही! तळोजा आणि खारघरच्या जनतेला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.
Post a Comment