लायन्स क्लब ऑफ सरगम पनवेलतर्फे जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
पनवेल : सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ सरगम पनवेल यांच्यावतीने पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
याप्रसंगी लायन्स डिस्ट्रिक्ट रिजनचे चेअरमन अल्केश शहा, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी,लायन्स पनवेल सरगमचे अध्यक्ष आदित्य दोशी,सचिव मानदा पंडित,माजी अध्यक्ष स्वाती गोडसे,उपाध्यक्ष संध्या महानुभाव,धवल शहा, डिस्ट्रिक्टचे सहखजिनदार संजय गोडसे आणि सुयोग पेंडसे त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी भोसले, शिक्षक रवींद्र रोटकर,विजेता पाटील,वर्षा पाटील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने क्लबच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळाली असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत,असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी अल्केश शहा,संजय गोडसे,गणेश कोळी,आदित्य दोशी यांची भाषणे झाली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मानसी भोसले यांनी केले.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांनी शाळेतील नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची यशोगाथा लेखाच्या माध्यमातून मांडली होती,त्यांच्या या लेखनाची राष्ट्रीयस्तरावर दखल घेतली गेल्याने जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक कार्याला एक नवी ओळख मिळाली आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लायन्स क्लब ऑफ सरगम पनवेल यांच्यावतीने मुख्याध्यापिका मानसी भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment