जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये औद्योगिक विद्युत एक्सप्रेस फीडरचे सोमवारी भूमिपूजन
पनवेल- कामोठे जवळील जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट लि., कामोठे,पनवेल येथे उद्योगांना अधिक सक्षम व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक विद्युत एक्सप्रेस फीडरच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन सोमवार, दि.२८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर,आमदार विक्रांत पाटील,पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन जे.पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी श्री.किशन एन.जावळे,उद्योग व सेवा विभागाचे संयुक्त आयुक्त श्री.संदीप पाटील,पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री.मंगेश चितळे,उद्योग व सेवा विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.जी.एस.हरळ्या तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.दीपक पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्थळ: जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट लि.,
संस्थेचे कार्यालय,कामोठे,पनवेल
वेळ: सकाळी ११.३० वाजता
दिनांक: सोमवार, २८ सप्टेंबर २०२६
स्वप्निल प्रदीप गुप्ते
अध्यक्ष
जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट लि., कामोठे, पनवेल
Post a Comment