मातीला आकार देत विद्यार्थ्यांनी साकारला बाप्पा .... डेरवली शाळेतील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
पनवेल - रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील डेरवली शाळेत आनंददायी शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शाडू माती व लाल मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि कौशल्याने मातीला आकार देत सुंदर गणपती मूर्ती साकारल्या.या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कृती कौशल्याला चालना मिळाली,नवनिर्मितीची क्षमता विकसित झाली तसेच पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले.
मातीपासून स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता. ‘नवनिर्मितीतून आनंद आणि पर्यावरणातून संवर्धन’ असा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
Post a Comment