ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान...ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा मुंबईत राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळा संपन्न ...पत्रकारितेतील आतापर्यंतच्या कार्याची पोचपावती - ज्येष्ठ पत्रकार संजय कदम
पनवेल - ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याला दैनिक पुढारी मुंबई आवृत्तीचे संपादक राजेश नाईक,केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल,विश्वस्त गणेश कोळी,युयुत्सु आर्ते,प्रदेशाध्यक्ष एड.विठ्ठल मोघे,सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत,सदस्य अनिल कुरघोडे आदी उपस्थित होते.
या पुरस्कारात आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार नांदेड येथील दैनिक स्वतंत्र वार्ताचे कार्यकारी संपादक कालिदास अंनतोजी,संपादक नानासाहेब जोशी यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार रत्नागिरी येथील वरिष्ठ पत्रकार मकरंद भागवत,पांडुरंग भटकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार बुलढाणा चिखली येथील श्याम देशमुख,हेमंत कुलकर्णी मराठी संपादक पुरस्कार या नावाने दिला जाणारा यंदा परभणी पूर्णा येथील नागनाथ नागठाणे,मधुकर लोंढे स्मृती साप्ताहिक पुरस्कार युवराज धनवडे दै.पुण्यनगरी कोल्हापूर, नवीन सोष्टे स्मृती मराठी वार्ताहर पुरस्कारासाठी अकोला येथील बाळकृष्ण नेरकर,मधु रावकर शहर वार्ताहर पुरस्कारासाठी ठाणे येथील महादेव माने,जयानंद मठकर पुरस्कार पुणे येथील अमरसिंग परदेशी,शरददादा बोरकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार राजू रणवीर तर दलित मित्र रमाकांत आरते पुरस्कार रायगड येथील सुभाष पाटील तर राज्यस्तरीय दर्पण प्रेरणा पुरस्कार परभणी येथील मराठवाडा केसरीचे कार्यकारी संपादक सत्यजित गावंडे, याशिवाय जीवन गौरव पुरस्कार मालाड येथील निसार अली सय्यद तर पनवेल येथील संजय कदम या दोघांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून या पुरस्कार सोहळ्यासाठी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारितेतील आतापर्यंतच्या कार्याची पोचपावती
- ज्येष्ठ पत्रकार संजय कदम
“पत्रकारितेतील जीवनगौरव पुरस्कार हा माझ्यासाठी केवळ सन्मान नसून,आतापर्यंतच्या कार्याची पोचपावती आणि भविष्यात अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे.या पुरस्कारामुळे समाजाप्रती, पत्रकारितेच्या मूल्यांप्रती आणि सत्यनिष्ठ कार्याप्रती माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे. यापुढेही अधिक निर्भीड, निष्पक्ष आणि संवेदनशील पत्रकारिता करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
Post a Comment