News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चे नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चे नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन

पनवेल (प्रतिनिधी)  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ च्या भव्य मूट कोर्टचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि.५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता खांदा कॉलनी येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहून म्हणून पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील,उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी,पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर,रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर,महापौर नितीन पाटील,तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य उभे केले असून, उच्च शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा सातत्याने भर राहिला आहे. संस्थेने १९९२ मध्ये आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली असून आज विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार केला जात आहे. भगुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ हे संस्थेच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊल असून, कायद्याच्या विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी आणि भविष्यातील कायदेपेशासाठी त्यांची सक्षम तयारी व्हावी, या उद्देशाने मूट कोर्ट सारख्या आधुनिक सुविधेला महत्व आहे. भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ या कॉलेजची स्थापना शैक्षणिक वर्ष २००९-१० मध्ये करण्यात आली असून ते मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेखाली कार्यरत आहे. तरी हितचिंतक नागरिक, पालकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य परेश ठाकूर यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment