लायन्स क्लब सरगमच्या अध्यक्षपदी आदित्य दोशी
पनवेल - लायन्स क्लब ऑफ पनवेलने गेल्या तीन वर्षात जे उत्कृष्ट कार्य केले आहे ते फारच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन संतोष शेट्टी यांनी, गोखले सभागृह पनवेल येथे झालेल्या सरगम लायन्स क्लबच्या नवीन पदग्रहण सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणुन बोलताना केले.यावेळी व्यासपीठावर संतोष शेट्टी यांच्यासोबत विशेष अतिथी विजय गणात्रा, रिजन चेअरमन अल्केश शहा,झोन चेअरमन, नारायण कट्टी हे होते.
या कार्यक्रमात सरगम क्लबचे सन 2026-27 चे अध्यक्ष म्हणून आदित्य दोशी यांनी पदभार स्वीकारला.
सरगम क्लबचे मावळते अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा यांनी उपस्थितांचे स्वागत करुन गेल्यावर्षी केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि मल्टिपल डिस्ट्रिक्ट तर्फे क्लबला विविध पारितोषिकांनी सन्मानित केल्याचे सांगितले. प्रेमेंद्र बहिरा यांच्यातर्फे गतवर्षी त्यांना सहकार्य केलेल्या सभासदांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात सरगम क्लबमध्ये नवीन सभासद झालेल्या ॲड. सुरेखा भुजबळ, गीतेश नवधरे, किरण पाटील यांना विशेष अतिथी प्रथम प्रांतपाल विजय गणात्रा यांनी सभासदत्वाची शपथ दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष आदित्य दोशी यांनी अध्यक्ष म्हणुन काम करण्याची संधी दिल्याबद्दल सरगम क्लबच्या सर्व सभासदांचे आभार मानले आणि यावर्षी सुद्धा विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करुन सरगम क्लबची परंपरा पुढे नेणार असल्याचे सांगितले.
आदित्य दोशी यांनी आपल्या कारकिर्दीचा पहिले उपक्रम म्हणुन साई आश्रय वृद्धाश्रम येथे 1 महिन्याला लागणारे किराणा सामान देण्यात आले तसेच एका गरजु महिलेला शिलाई मशीन देण्यात आले.
याचवेळी मुख्य अतिथी संतोष शेट्टी यांनी नवनिर्वाचित सचिव मानदा पंडित, खजिनदार अनिल परमार, सहसचिव सुषमा पन्हाळे, सहखजिनदार मिलिंद जोशी, उपाध्यक्ष संध्या महानुभाव, जयेश मणियार, टेमर मोहिनी जोशी, टेलट्विस्टर महेंद्र लोहार आणि संचालक म्हणुन संजय गोडसे, स्वाती गोडसे, अल्केश शहा, राजेंद्र महानुभाव, धवल शहा यांना त्यांच्या पदाची शपथ दिली.
विजय गणात्रा यांचा परिचय राजेंद्र महानुभाव तर संतोष शेट्टी यांचा परिचय संजय गोडसे यांनी करुन दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती गोडसे यांनी केले.या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट पदाधिकारी सत्यपाल चुघ,अनुप थरवाणी,अनिल म्हात्रे,सुयोग पेंडसे,सुरभी पेंडसे,उलवे क्लबचे मिलिंद पाटील,उमेश जाधव,द्रोणगिरी क्लबचे मोनिका चौकर, सागर चौकर, शलिओ काळसेकरचे अली खान आणि सभासद, ओंकार खेडकर,अंकिता म्हात्रे तसेच पनवेल आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment