News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमचे सर्व पर्यवेक्षक बदलले,तर एकाचे निलंबन

पनवेल महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमचे सर्व पर्यवेक्षक बदलले,तर एकाचे निलंबन

पनवेल  : पनवेल महानगरपालिकेमार्फत गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण संदर्भात मोठ्या प्रमाणात मोहिम सुरू करण्यात आली आहे.या अंतर्गत कोणत्याही अतिक्रमणाबाबत दुर्लक्ष केले जाणार नाही तसेच कामाबाबत कसूर करणाऱ्यांच्याबाबत गय केली जाणार नाही. अतिक्रमणाबाबत कारवाई करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने जागरूकतेने कारवाई करावी. कोणत्याही अमिषास बळी न पडू नये,अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

सर्व प्रभागात कारवाई
गेल्या काही दिवसांपासून कामोठे,खारघर,पनवेल,कळंबोली अशा चारही प्रभागात अतिक्रमणाबाबतच्या तक्रारी विविध माध्यमातून येत होत्या,त्यावर आळा घालण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांनी कठोर कारवाईची पाऊले उचलली आहेत. अतिक्रमण विभागातील सध्या कार्यरत असलेल्या सर्व पर्यवेक्षकांना बदलले.तसेच त्यांच्या जागी अन्य विभागातील पर्यवेक्षक देण्यात आले आहेत अतिक्रमण हटाव कामात हलगर्जी पणा केल्याचे निर्दशनास आल्याने पर्यवेक्षक प्रशांत गायकर यांना निलंबित केले आहे. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने  सध्या जोरदार कारवाई सुरू असून यात प्रामुख्याने अनधिकृत बॅनर व होर्डिग्जवर तोडक कारवाई करण्यात आली. आठवडी बाजारांवरही कारवाई करण्यात आली.जवळपास सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत.याचबरोबरीने फूटपाथवरील अतिक्रमणाविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.खारघर येथील मोठमोठ्या हॉटेल्स बाहेरील सिमांत भागातील बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे.तसेच कामोठ्यात नर्सरी व हातगाड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे.

विशेष टास्क फोर्स
 महापालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी विशेष टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे.यामध्ये 10 सुरक्षा रक्षक व 10 अतिक्रमण विभागाचे कर्मचारी असतील.तसेच  रात्रीच्या वेळीही गस्त घालण्यात येणार आहे. 

अतिक्रमण संदर्भात विशेष दखल घेत प्रभागनिहाय महापालिका सदस्यांच्या समवेत बैठका घेऊन,त्यांच्याकडून आलेल्या सूचनांची तात्काळ दखल घेण्यात येत आहे,अशी माहिती अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी दिली आहे.

अतिक्रमणाबाबत नागरिकांना कोणतीही तक्रार करावयाची असल्यास महापालिकेच्या पनवेल कनेक्ट ॲपवर करावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment