कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धीचीच निर्मिती - प्रा.एल.बी.पाटील ....जितेंद्र मांजरेकर यांच्या “पंख मायेचे” काव्यसंग्रहाचे प्रकाशन .... “कृत्रिम बुद्धिमत्तेला धोका आहे काय ?” परिसंवादाचे आयोजन ... कोकण मराठी साहित्य परिषद म्हसळा शाखेचा उपक्रम
म्हसळा - कोकण मराठी साहित्य परिषद म्हसळा शाखा आयोजित केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात कवी जितेंद्र मांजरेकर लिखित “पंख मायेचे” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला आणि “कृत्रिम बुद्धिमत्तेला धोका आहे काय ?” या विषयावरील परिसंवादाला प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद विश्वस्त एल.बी.पाटील होते.आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी मानवतेचा विचार अधोरेखित करत,“मानवता हाच खरा धर्म असून प्रत्येकाच्या मनात सृजनता असणे गरजेचे आहे.विशेषतः बालमनात सृजनतेची बीजे रुजवली पाहिजेत.कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धीचीच निर्मिती असून तिचा योग्य वापर सृजनतेसोबत केल्यास बौद्धिक क्षमता वृद्धिंगत होऊ शकते,”असे प्रतिपादन केले.यावेळी त्यांनी कवी जितेंद्र मांजरेकर यांच्या “पंख मायेचे”काव्यसंग्रह आणि परिसंवाद आयोजनाचे कौतुक करत त्यांच्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उपस्थित मान्यवरांनीही काव्यसंग्रहाचे मनापासून स्वागत करत त्यांच्या लेखनातून साहित्य क्षेत्रात अधिक भर पडावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड कोमसाप अध्यक्ष संजय गुंजाळ, वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,कोमसाप जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी,जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे,उरण शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे,परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.देविदास बामणे होते.परिसंवादात जेष्ठ साहित्यिक विलास यादव,डॉ.सुभाष ओक आणि निवेदक प्रा.रायप्पा माशाळे यांनी विषयाचे सखोल विश्लेषण करत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सृजनता यातील संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाला माजी सभापती महादेव पाटील, न्यू इंग्लिश स्कूल प्राचार्य धर्मराज पाटील,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,नगरसेविका जयश्री कापरे,नगरसेविका राखी करंबे,माजी नगरसेविका संपदा पोतदार,प्रा.सुमित्रा खेडेकर, श्रीवर्धन शाखा उपाध्यक्ष प्रसाद जोशी,ग्रंथपाल नंदकुमार चितळे,प्रा.बेंद्रे सर,प्रा.सिद्दिकी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण मराठी साहित्य परिषद,म्हसळा शाखा यांच्या सौजन्याने आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा अध्यक्ष प्रा.रायप्पा माशाळे,उपाध्यक्ष सुनील उमरोटकर,जिल्हा प्रतिनिधी अशोक काते,महिला युवा अध्यक्षा अपर्णा ओक,सदस्या विभा खांबेटे,
कोषाध्यक्ष उदय करडे,सह सचिवा मिनल ढवळे यांनी अथक परिश्रम घेतले.उत्कृष्ट सूत्रसंचालन व स्वागत प्रा.रायप्पा माशाळे यांनी प्रास्ताविक जेष्ठ मार्गदर्शक सुनिल उमरोटकर यांनी तर आभार अशोक काते यांनी मानले.साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा प्रेरणादायी ठरला.
Post a Comment