भाजप जगात सर्वात मोठा पक्ष- माजी सरपंच रामेश्वर आंग्रे .... करंजाडेत भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल - असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि योगदानातून भारतीय जनता पक्षाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. राष्ट्रवादी विचारधारा अंत्योदयाचा सिद्धांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी केले.
करंजाडे भाजप जनसंपर्क कार्यालयात सोमवार 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा 46 वा स्थापना दिवस मोठया उत्साहात पार पडला यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, गजानन पाटील माजी उपसरपंच, पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, जिल्हा परिषद सदस्य सोनाली जितेकर, मानखुश नाईक युवा नेता, बळीराम म्हात्रे माजी सरपंच, अनुज जितेकर युवा नेते, प्रथमेश पुंडे संयोजक, भरत राणे मंगेश बोरकर, अतिष साबळे सदस्य, तुषार नागे सदस्य, नाथा भरवाड, राजेश गायकर, शैलेश चव्हाण, उमेश भोईर, केतन आंग्रे, धोंडू भोईर, सतीश धुमाळ पांडुरंग मामले, सुषमा मयेकर महिला अध्यक्ष करंजाडे, चैताली माळी, ज्योती तातरे, नसीम शेख, सर्वरी पोयितकर, अन्वी गुरव, रश्मी गुप्ता, कांता गायकवाड, श्रुती दिवेकर, वर्षां गायकवाड, रुपाली नागे, निशा गायकवाड, शर्मा मॅडम, सुरेश भोईर, विनेश गायकवाड, प्रितम फडके, प्रकाश भोईर, हरेश आंग्रे, गणेश भोईर, अशोक विखारे रिक्षा संघटना अध्यक्ष, जहीर शेख ओंकार चौधरी, जितू सिशवे उपस्थित होते.
पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या कुशल नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास तसेच 'राष्ट्र प्रथम' या मंत्राला आदर्श ठेवून सर्व समावेशक कार्यशैलीतून भारतीय जनता पक्षाकडून देशात विकास सुरू आहे. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी करंजाडे विभागातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
फोटो --
Post a Comment