भगवान महावीर जंयतीच्या दिवशी मांसविक्री केन्द्र बंद ठेवण्याबाबत महापौर नितीन पाटील यांना निवेदन
पनवेल (वार्ताहर): दिनांक ३० मार्च सोमवार रोजी भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त त्या दिवशी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कत्तलखाने,मांसविक्री केन्द्र व हिंसात्मक क्रीया बंद ठेवण्याबाबत पनवेलचे महापौर श्री.नितीन पाटील,उपमहापौर प्रमिला पाटील यांना निवेदन देण्यात आले व याविषयांवर तत्काल उचित कार्रवाई करण्याची मागणी अखिल भारतवर्षिय दिगंबर जैन श्रमण सेवासंघातर्फॅ श्री.सुजित राजकुमार खोलापुरे यांनी केली,असेच निवेदन आयुक्त व उपायुक्त परवाना विभाग- विभुते यांना पण देण्यात आले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये तीन दिगंबर जैन समाजाचे भव्य जैन मंदिर( नविन पनवेल, खारघर व उलवे) असुन शेकडो भाविक या परिसरात वास्तव्यास आहेत. नविन पनवेल येथील श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरातुन सकाळी 7:30 वाजता भव्य शोभायात्रा,जुलुस निघणार आहे.अभिषेक,जन्मोत्सवाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.मांसविक्री बंद ठेऊन महानगरपालिकातर्फे अहिंसेचे अवतार भगवान महावीर स्वामींना हीच खरी विनयांजली असेल असे खोलापुरे यांचे म्हणने आहेत व त्यांना प्रशासन तर्फे पुर्ण सहकार्य मिळेल असे उपायुक्त श्री विभुते यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पालिका प्रशासन तर्फे भ.महावीर यांचे विचार,उद्बोधन यांचा प्रचार प्रसार मुख्य आठ-दहा ठिकाणी लावुन करण्यात यावा अशी देखील मागणी सकल जैन समाजाच्यावतीने श्री खोलापुरे यांनी केली आहेत.
Post a Comment