डॉ.किरण चचलानी यांना ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम भारत पुरस्कार’ प्रदान
पनवेल - बॉस चक्की फ्रेश आटा’ आणि ‘बॉस फूड्स प्रॉडक्ट्स’चे संस्थापक डॉ. किरण चचलानी यांना प्रतिष्ठित ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम भारत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.हा सन्मान कलाम कुटुंबातील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी कलाम कुटुंबातील श्री.एपीजेएमजे सलीम शेख तसेच ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन’चे सचिव श्री.एपीजेएम जैनुलाबुदीन उपस्थित होते.याशिवाय जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय विलास वैद्य, कार्यक्रमाच्या आयोजिका सौ.सोनिया मेयर्स तसेच परीक्षक मंडळ आणि सल्लागार डॉ.राकेश पोडुवाल हेही यावेळी उपस्थित होते.या पुरस्कारामुळे डॉ.चचलानी यांच्या उद्योग क्षेत्रातील योगदानाची दखल घेतली गेली असून,त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
Post a Comment