जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांसाठी विशेष योग वर्गाचे पनवेलमध्ये आयोजन .... श्री अंबिका योग ठाणे यांच्या पनवेल शाखेचा उपक्रम
पनवेल - श्री अंबिका योग ठाणे यांच्या पनवेल शाखेच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी नि: शुल्क त्रैमासिक मासिक विशेष योग वर्ग सुरू करीत आहेत.
शाखेचे २५ वे वर्ष असून महिलांना होणारे त्रास यामध्ये कंबर दुखणे, गुडघे दुखणे,पाय दुखणे,पाळीचे त्रास,मानसिक बेचैनी,चिडचिड होणे,वजन वाढणे,पचनाचे त्रास, रक्तदाब,मधुमेह,बद्धकोष्ठता,पित्ताचा त्रास,कफाचे विकार, अस्थमा,हृदय संबंधित समस्या इत्यादी आजारांवर उपयुक्त अशा क्रियांसाठी विशेष हा वर्ग चालविला जाणार आहे.
शनिवार दि. ७ मार्च २०२६ रोजी ( दर शनिवार संध्याकाळी ४ ते ६) ,ठिकाण - श्री साईबाबा मंदिर, श्री साई नारायणबाबा आश्रम, पनवेल .... अधिक माहितीसाठी भावना कुलकर्णी 9819611749,सुजाता माने 9920776952
Post a Comment